गव्हाचे उत्पादन वाढले पण दर मात्र घसरले

17 Mar 2026 20:04:33
तभा वृत्तसेवा
नेर, 
wheat-production : सध्या शेतकèयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा गव्हाचा हंगाम अतिशय जोरात सुरू असून यावर्षी गव्हाचे उत्पादन अतिशय चांगले आहे. मात्र गव्हाचे दर घटल्याने शेतकèयांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. एकरी 10 ते 15 क्विंटलपर्यंत उतारा गव्हाला मिळत आहे. त्यामुळे शेतकèयांमध्ये समाधानाची भावना आहे. पण दुसरीकडे मागील वर्षाच्या तुलनेत बाजारात गव्हाला दर कमी मिळत असल्याने शेतकèयांची अडचण झाली आहे.
 
 
wheat-production
 
 
 
मागील वर्षी साधारण 2500 ते 3000 हजार रुपये प्रति क्विंटल गहू विकला गेला. पण यावर्षी 2000 ते 2300 या दराने विकावा लागत आहे. बाजारात अस्थिरता, जास्त उत्पादन यामुळे व्यापारी व गावातील ग्राहक कमी दराने मागणी करत असल्याने शेतकèयांची आर्थिक कोंडी झाली आहे.
 
 
परंतु दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मिळेल त्या भावाने सध्या शेतकरी गव्हाची विक्री करताना दिसत आहे. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असल्याने काही दिवस थांबून विक्री केल्यास गव्हाचे दर थोडेफार वाढू शकतात, असे बाजार जाणकारांचे मत आहे.
Powered By Sangraha 9.0