बारामतीत लढणार आणि जिंकणारच!

17 Mar 2026 19:28:50
बारामती
Baramati बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. ङ्गआम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो,ङ्घ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

baramati election
बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना हाकेंनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. त्यांनी थेट पवार कुटुंबीयांवर टीका करत, सुनेत्रा पवार यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची मागणी केली. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर घ्या आणि येथे पवार कुटुंबीयांबाहेरील उमेदवार उभा करा, असे हाके म्हणाले.
Baramati हाके पुढे म्हणाले, आम्ही निवडणूक लढवतो म्हटलं की काहींच्या पोटात दुखतं. पण आम्ही मागे हटणार नाही. बारामतीत पर्याय उभा करून विजय मिळवणारच. त्यांनी हेही स्पष्ट केले की, मीच उमेदवार असेन असं नाही, स्थानिक कार्यकर्ताही उमेदवार असू शकतो.
Baramati दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक जाहीर झाली असून, ती बिनविरोध होईल अशी चर्चा सुरू होती. मात्र हाकेंच्या भूमिकेमुळे या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तसेच, राज्य सरकारच्या अनेक धोरणांविरोधात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. शरद पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्यात आलं, मग सुनेत्रा पवार यांनाही विधानपरिषदेवर तसंच पाठवा, अशी मागणीही त्यांनी केली.
Powered By Sangraha 9.0