इतवारीत महिला स्कूटर रॅली

17 Mar 2026 17:50:48
नागपूर,
scooter rally in Itwari नववर्षाच्या स्वागतानिमित्त भारतीय नववर्ष स्वागत समिती, इतवारी भागाच्या वतीने बुधवारी, दि. १८ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महिलांसाठी अभिनंदन स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली आग्याराम मंदिरापासून प्रारंभ होऊन पोद्दारेश्वर राम मंदिर येथे संपेल. या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी घोषवाक्य स्पर्धा, स्कूटर सजावट स्पर्धा तसेच उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

scooter rally in Itwari
प्रत्येक स्पर्धेत तीन विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील. उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत विजेते ठरणाऱ्या महिलेला राजलक्ष्मी साडी तर्फे पैठणी प्रदान केली जाणार आहे. scooter rally in Itwari  रॅलीत सहभागी प्रत्येक महिलेला रोकडे ज्वेलर्सकडून एकदाणी भेट दिली जाईल. पोद्दारेश्वर राम मंदिर येथे अल्पोपाहारानंतर कुपन दाखवून भेटवस्तू स्वीकारता येईल.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0