प्रेम, फसवणूक आणि रक्तरंजित कट! पती-पत्नीच्या कटाने EX चा खेळ संपला

17 Mar 2026 15:20:22
यवतमाळ,
husband-and-wife-murder-ex-boyfriend : लाडखेड हद्दीत एका विवाहित स्त्रीने आपल्या पतीसोबत मिळून तिच्या EX बॉयफ्रेंडचा भयंकर खून केला. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक करून सविस्तर चौकशी सुरू केली आहे.
 
 
ytl
 
 
 
मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अतिष देशमुख असून, आरोपी पती अंकुश खोडे आणि पत्नी रुपाली खोडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपालीशी लग्नाआधीच अतिष देशमुखचा प्रेमसंबंध होता. विवाहानंतरही अतिष रुपालीवर दबाव टाकत पतीला सोडण्याची मागणी करत होता.
 
 
घटनेच्या दिवशी, १५ तारखेला आरोपींनी फोन करून अतिषला लाडखेड परिसरात भेटीस बोलावलं. या वेळी पती अंकुशने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जोरदार मारहाण केली, तर रुपालीने चाकूने वार केला. या भयंकर हल्ल्यात अतिष जागीच ठार झाला.
 
 
पोलीसांनी तपासात उघड केले की, या हल्ल्यापूर्वी अतिषने पती-पत्नीला त्रास दिला होता आणि लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधातून ही घटना घडली. आरोपी पती-पत्नी या घटनेनंतर फरार झाले होते, पण पोलिसांनी फोन कॉल तपासून त्यांचा ठिकाण उघड केला आणि ताब्यात घेतले.
 
 
स्थानिक गुन्हे शाखा आता सविस्तर चौकशी करत आहे. पोलीसांनी सांगितलं की, आरोपींनी कबुली दिली आहे की, अनैतिक प्रेमसंबंधामुळे हा खून घडवला. या घटनेमुळे परिसरात संताप व भीती पसरली आहे.
 
 
या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0