गोपाल चिकाटे
तळेगाव शा,.
talegaon for gudi padwa अमरावती, नागपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असलेले तळेगाव (श्या.पंत) हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने ओळखले जात असले तरी येथील धार्मिकदृष्ट्याही तेवढेच महत्त्वाचे आहे. येथील पुरातन अवधूत महाराज मंदिरातील प्रथा अजुनच वेगळी आहे. येथे दसरा आणि गुढीपाडव्याला ४७ फूट उंच असलेल्या झेंड्यावर खोळ (गवसनी) चढवली जाते. यावर्षी खोळ चढवण्याच्या नित्यक्रमाला ५१ वर्षे होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले. गुढीपाडवा ते रामनवमी असे सात दिवस येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील जुन्या वस्तीमध्ये अवधूत महाराजांचे पुरातन मंदिर आहे. तेथे माघ शुद्ध प्रतिपदेपासुन सात दिवस भागवत कथेचे आयोजन करण्यात येते. या सात दिवसात जुन्या गावात घरोघरी नातेवाईक येतात. गावातून दररोज प्रभात फेरी निघते. त्या प्रभात फेरीच्या स्वागताला प्रत्येक घरासमोर सडा टाकून रांगोळी काढली जाते. भाविक भक्तांची येथे श्रद्धा असल्याने दूर दुरून भतगण दर्शनाला येतात.
अवधूत महाराज मंदिरासमोर अवधून महाराजांचे सांप्रदायीक प्रतीक म्हणून दोन झेंडे आहेत. एका झेंड्याची उंची ४५ तर दुसर्या झेंड्याची उंची ४७ फूट आहे. या झेंड्यांना दरवर्षी दसरा व गुढीपाडव्याला नवीन खोळ चढविल्या जाते. ही खोळ ३० ते ४० मिटर कापडातून तयार केली जात असल्याचेही सांगण्यात आले. १९ मार्चला दुपारी झेंड्यांना खोळ चढविण्यात येणार आहे. गुढीपाडव्याला सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भतांची मोठी गर्दी असते.
झेंड्यांना नवीन खोळ (गवसणी) चढविण्याचा मान येथील अनिल खवले यांना देण्यात येतो. झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोरांच्या मदतीने झेंड्याची जुनी खोळ काढून नवीन खोड चढविली जाणार आहे.talegaon for gudi padwa विशेष म्हणजे हा खोळीचा कापड भत श्रद्धेने देतात. आता कापडाची देण्याची बुकिंग सन २०३२ पर्यंत असल्याचे अवधूत महाराज देवस्थानचे अध्यक्ष शिरीष बुले यांनी तरुण भारत प्रतिनिधीला सांगितले. यापूर्वी चंद्रपूर व नागपूर येथील भक्तांनी कापड देऊन खोळ चढविली होती. अवधूत महाराज देवस्थान येथे नवीन दोन झेंडे मेळघाटच्या जंगलातून आणण्यात आले होते.