आज मी अनाथ झालो…

18 Mar 2026 11:23:18
देहरादून
Anurag Dobhal अनुराग डोभाल याने अलीकडील अपघातानंतर प्रथमच रुग्णालयातून सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. इन्स्टाग्राम लाइव्हदरम्यान वेगाने गाडी चालवताना झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या दोन्ही कूल्ह्यांच्या हाडांना फ्रॅक्चर झाले असून फुफ्फुसांनाही दुखापत झाली होती. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
 

Anurag Dobhal accident, Anurag Dobhal health update 
काही दिवस उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र देहरादूनला घरी नेत असताना त्याची प्रकृती पुन्हा खालावली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला पुन्हा जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या फुफ्फुसांवरील इजा आणि न्यूमोनियाचा त्रास लक्षात घेऊन उपचार सुरू ठेवले.
दरम्यान, रुग्णालयातून शेअर Anurag Dobhal  केलेल्या पोस्टमध्ये अनुरागने आपल्या भावनिक अवस्थेचा उल्लेख केला आहे. “मी जिवंत राहीन असं कधीच वाटलं नव्हतं. ज्या मार्गावर मी गेलो होतो, तिथून परत येणं अशक्य होतं. माझ्यासाठी हे सगळं एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आज मी स्वतःला अनाथ समजतो. पुढे काय होईल हे मला माहीत नाही, पण देवाने मला नवं आयुष्य दिलं आहे,” असे त्याने लिहिले.पुढे तो म्हणतो, “माझ्यासाठी अनेक लोक चिंतेत आहेत. मी आता आयसीयूमधून बाहेर आलो असून सध्या सुरक्षित आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, त्यांचे मनापासून आभार. कदाचित तुमच्या प्रार्थनांमुळेच मला हे नवजीवन मिळाले आहे.”यापूर्वी, १५ मार्च रोजी त्याचा मॅनेजर रोहित पांडे यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले होते की, डिस्चार्जनंतर प्रवासादरम्यान अनुरागची तब्येत बिघडली. ऑक्सिजन मास्कसह त्याला रुग्णवाहिकेतून पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता.दरम्यान, बिग बॉस मधील माजी स्पर्धक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुरागच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत असून, पुढील काही दिवस त्याच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू राहणार आहेत.
Powered By Sangraha 9.0