आधी मानवी अवयव.... अन आता संपूर्ण मृतदेह सापडल्याने खळबळ

18 Mar 2026 17:15:57
वाशीम,
brutal murder अंगावर काटा आणणार्‍या घटनेचा उलगडा झाला आहे. मुरुमाच्या ढिगार्‍यात तुकड्या-तुकड्यांत सापडलेल्या मानवी अवयवांनंतर, आज १८ मार्च रोजी दुपारी त्याच ठिकाणच्या दुसर्‍या ढिगार्‍यात संपूर्ण मानवी शरीर आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हे केवळ मृत्यू नसून अत्यंत क्रूरपणे केलेला नरसंहार असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
 

आधी मानवी अवयव.... अन आता संपूर्ण मृतदेह सापडल्याने खळबळ 
 
 
१७ मार्च रोजी रात्री मुरुमाच्या एका ढिगार्‍यात अचानक मानवी शरीराचे काही कापलेले अवयव स्थानिकांना दिसून आले. ही बातमी वार्‍यासारखी पसरताच परिसरात भीतीचे सावट पसरले. वाशिम पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. १८ मार्च रोजी सकाळी पोलिसांना संशय आल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी शेजारीच असलेल्या दुसर्‍या मुरुमाच्या ढिगार्‍याला उपसले असता, त्याखाली गाडलेले संपूर्ण मानवी शरीर बाहेर आले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मुरुमाच्या ढिगार्‍याचा वापर करण्यात आला होता. मृतदेहाची अवस्था पाहता, आरोपींनी अतिशय थंड डोयाने आणि क्रूरपणे हे कृत्य केल्याचे दिसून येते. ही हत्या कुठे झाली आणि मृतदेह इथे आणून कसा टाकला, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वाशीम पोलिसांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
वाशीम शहर व ग्रामीण पोलिस घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी करत आहेत. तर स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असून संशयितांच्या मुसया आवळण्याच्या तयारीत आहे.brutal murder आसपासच्या परिसरातील फुटेज आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची पडताळणी सुरू आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुराव्यांची साखळी जोडली जात असून, पोलिसांच्या संयुक्त पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. लवकरच या भीषण गुन्ह्याचा मास्टरमाईंड जेरबंद होईल.
Powered By Sangraha 9.0