शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी भीक मागो आंदोलन

18 Mar 2026 18:51:21
वाशीम, 
begging-movement : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक या रस्त्यावर पडलेले खड्डे व उखडलेल्या गिट्टीमुळे अत्यंत धोकादायक बनलेल्या रस्ता दुरुस्तीसाठी नगर परिषद व संबंधितांकडे वारंवार निवेदन व तक्रारी दिल्या. परंतू प्रत्येक वेळी निधी नसल्याचे कारण पुढे करीत सदर मागणीकडे न.प. दुर्लक्ष केले. परंतू दिवसें दिवस अत्यंत धोकादायक बनत असलेल्या या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढून वाहनधारक, परिसरातील व्यापारी व शहरवासी बेजार झाल्यामुळे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सामाजीक कार्यकर्त्यांनी १८ मार्च रोजी चक्क भिक मांगो आंदोलन करुन जमा झालेली भिकेची एकूण १६३२ रुपयांची रक्कम नगर परिषदेला सुपूर्द केली.
 
 
 
washim,
 
 
 
वाशीम शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री बालाजी मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणार्या या प्रमुख रस्त्याची झालेली बिकट अवस्था नगर परिषदेच्या वारंवार नजरेस आणून देण्यात आली. परंतु, नगर परिषदेकडून निधी नसल्याचे कारण पुढे करीत मागील अनेक वर्षांपासून खड्डेमय झालेल्या या रस्त्यावरुन वाहनधारक व नागरिकांना प्रवास करायला लावून जणूकाही एक शिक्षाच भोगून प्रवास करणे भाग पडत आहे. यामुळे शहरातील सामाजीक कार्यकर्त्यांच्यावतीने नगर परिषदेच्या वृत्तीला कंटाळून त्या निषेधार्थ भीक मागो आंदोलन करून जमा झालेली भिक नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे सुपर्दू करुन रितसर पावती घेण्यात आली. व सदर रक्कम वरिष्ठांपर्यंत पोहोचून आम्हाला रस्ता दुरुस्ती करुन द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
 
 
 
सदर भिक मांगो आंदोलन सामाजीक कार्यकर्ते अजय मोतीवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनामध्ये प्रतिक कांबळे, ओमप्रकाश फड, गजानन ठेंगडे, संतोष व्यास, संध्या सभादिंडे, छायाताई पवार, सखु बनसोड, भूषण देशपांडे, दिलीप भेंडेकर, भूषण मोरे, ताजू ठेकेदार, शाम दळवी, नंदू जैरव, किसनराव धोटे, संतोष इंगळे, आशुतोष वानखेडे, अमोल भेंडेकर, नरेश येल्हारे, शिवम घुगे, उध्दव मुंढे, गोलु गुप्ता, अमोल भेंडेकर, विजु पवार, मंगेश वानखेडे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरवासी सहभागी झाले होते.
Powered By Sangraha 9.0