कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांचा एल्गार

18 Mar 2026 19:39:05
पुलगाव,
contract-cleaning-staffs-elgar : वेळेवर पगार न मिळाल्याने येथील नगर पालिकेतील कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला भाजपा नगरसेवक सतीश जयसिंगपुरे यांनी पाठिंबा जाहीर करीत कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांच्या रास्त मागण्या मान्य न झाल्यास आपण स्वत: कचरा आणून नगरपालिका कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा दिला आहे.
 
 
jk
 
 
 
राज्यभरातील सर्व नगरपालिकांमध्ये स्वच्छता विभागात शहराची स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कर्मचार्‍यांसह कंत्राटी पद्धतीवर स्वच्छता कर्मचार्‍यांची नियुती केली जाते. या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेत भर पडून सुंदरता टिकवून नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहते. पुलगाव नगरपरिषदेतही कंत्राटी पद्धतीने कर्मचार्‍यांची नियुती करण्यात आली आहे. त्यांचा पगार वेळेवर देणे बंधनकारक आहे. परंतु, सणासुदीच्या उंबरठ्यावर त्यांचा पगार न मिळाल्याने त्यांनी आज बुधवार १८ रोजी पासून नगरपालिका परिसरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या रास्त मागण्यांना भाजपा नगरसेवक सतीश जयसिंगपुरे यांनी पाठिंबा दर्शवून पालिका प्रशासनाने या कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे तात्काळ लक्ष न दिल्यास आपण स्वतः कचरा आणून नगरपालिका कार्यालयात टाकू, असा इशारा दिला.
Powered By Sangraha 9.0