नयनताराबाबत खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य!

18 Mar 2026 11:54:55
चेन्नई.
Controversial statement about Nayanthara तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रचार सभेदरम्यान सी. व्ही. षण्मुगम यांनी केलेल्या वक्तव्यावरून सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी सुपरस्टार अभिनेत्री नयनताराचा हिचा उल्लेख करत केलेल्या उपरोधिक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर संताप व्यक्त केला जात आहे. विल्लुपुरम येथे झालेल्या आंदोलनात एआयएडीएमके नेत्यांनी डीएमकेसरकारवर टीका केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करताना षण्मुगम यांनी उपहासात्मक भाषेत बोलताना अभिनेत्रीबाबत अयोग्य टिप्पणी केली.
 
 
 
Nayanthara
 
त्यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिनयांच्यावर निशाणा साधताना, एखाद्याने नयनताराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तर सरकार ती पूर्ण करेल का?”असा प्रश्न उपस्थित केला.या वक्तव्यानंतर विरोधकांसह अनेक राजकीय पक्षांनी त्यांचा निषेध केला असून महिलांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. समाजमाध्यमांवरही नयनताराच्या चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत षण्मुगम यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, या संपूर्ण वादावर अभिनेत्री नयनतारा हिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या वक्तव्यामुळे तामिळनाडूमधील राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0