नवी दिल्ली,
fire-in-delhis-palam राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून एक भीषण घटना समोर आली आहे. दिल्लीतील पालम परिसरात आज सकाळी एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली, ज्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी घडली, जेव्हा तळमजल्यावरील एका कॉस्मेटिकच्या दुकानाला आग लागली. आग वेगाने वरच्या मजल्यांवर पसरली.
इमारतीत एकूण १८ लोक होते, त्यापैकी काहींनी वरच्या मजल्यावरून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला, परंतु बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने इतर अनेक जण आत अडकले. fire-in-delhis-palam प्राथमिक माहितीनुसार, आग लागल्यानंतर काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदत व बचाव कार्यात गुंतल्या आहे.
अग्निशमन दलाने नैऋत्य दिल्लीतील पालम परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालम मेट्रो स्टेशनजवळील लेन क्रमांक २ मधील एका इमारतीमधील घरात आग लागल्याचा फोन आला असून, काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. fire-in-delhis-palam घटनास्थळी तीस अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या असून, आग विझवण्याचे आणि बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाला सकाळी ७ वाजता फोन आला आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.