गोंदिया जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा

18 Mar 2026 20:02:50
गोंदिया, 
hailstorm-hits-gondia-district : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिरोली महागाव येथे बुधवारी १८ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसादरम्यान झालेल्या गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या गारपिटीने मका व इतर धान्य पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली असून शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
 
 
hailstorm-hits-gondia-district
 
 
 
हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्यात १७ ते २५ मार्च दरम्यान विजांसह पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र, पहाटेच्या सुमारास झालेल्या अचानक गारपिटीमुळे शेतकर्‍यांना कोणतीही पूर्वतयारी करता आली नाही. विशेषतः मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.घटनेनंतर परिसरातील शेतकर्‍यांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरीत पाहणी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Powered By Sangraha 9.0