नागपूर ,
Internal Railway Protection Force ऑपरेशन ‘सतर्क’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) नागपूरच्या डॉग स्क्वाडने मोठी कारवाई करत ट्रेन क्रमांक 20494 चंदीगड–मदुरई एक्सप्रेसमधून लावारिस अवस्थेत आढळलेल्या पाच बॅगमधून १७४ बाटल्या विदेशी मद्य जप्त केले. या मद्याची एकूण किंमत १,१२,५४५ रुपये असल्याची माहिती देण्यात आली.१७ मार्च २०२६ रोजी निरीक्षकांच्या आदेशानुसार श्वान ‘प्रिन्स’ (नार्को) सोबत पथकाने नागपूर ते सेवाग्राम दरम्यान तपासणी मोहीम राबवली. सकाळी ०८:५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या गाडीच्या एस-१ कोचमध्ये सीट क्रमांक १ ते ६ खाली संशयास्पद बॅग, कार्टून बॉक्स आणि प्लास्टिकची गोणी आढळून आली. मात्र, याबाबत कोणत्याही प्रवाशाने मालकी हक्क सांगितला नाही.
सदर साहित्य नागपूर येथे आणून तपासणी केली. Internal Railway Protection Force विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्यानंतर सहायक उपनिरीक्षक बी. डी. अहिरवार यांनी जप्त मद्य राज्य उत्पादन शुल्क विभाग, नागपूर यांच्या ताब्यात दिले.या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र