गुजरातच्या बंदरावर ‘जग लडकी’ टँकर दाखल; ८०,८०० मेट्रिक टन कच्चे तेल आणले

18 Mar 2026 11:44:22
गांधीनगर,
jag-ladki-tanker-arrives-at-gujarat-port
 देशात गॅसच्या पुरवठ्यात तुटवडा जाणवत असताना, भारतासाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘जग लडकी’ नावाचे भारतीय ध्वज असलेले तेलवाहू जहाज सुमारे ८०,८०० मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन संयुक्त अरब अमिरातीतून प्रवास पूर्ण करत गुजरातमधील मुंद्रा बंदरात बुधवारी सुरक्षितपणे पोहोचले.
 
jag-ladki-tanker-arrives-at-gujarat-port
 
हे जहाज रविवारी सकाळी फुजैरा बंदरातून निघाले होते. विशेष म्हणजे, फुजैरा येथील तेल साठवण केंद्रावर हल्ला झाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच हे जहाज तेथून मार्गस्थ झाले होते. १४ मार्च २०२६ रोजी हा हल्ला झाला, त्यावेळी ‘जग लडकी’ हे जहाज सिंगल पॉइंट मूरिंगवर कच्चे तेल भरत होते. jag-ladki-tanker-arrives-at-gujarat-port मात्र, परिस्थिती असूनही हे जहाज सुरक्षितपणे भारताच्या दिशेने रवाना झाले. या घटनेनंतर पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीतून सुरक्षितपणे बाहेर पडणारे ‘जग लडकी’ हे तिसरे भारतीय जहाज ठरले आहे. याआधी ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ ही दोन जहाजेही सुरक्षितपणे भारतात पोहोचली होती. दरम्यान, इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, सुरू असलेल्या संघर्षामुळे हा मार्ग काही देशांच्या जहाजांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
याआधी ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या जहाजांनी मिळून एकूण ९२,७१२ मेट्रिक टन गॅस भारतात आणला होता. ‘शिवालिक’ हे जहाज मुंद्रा बंदरात दाखल झाले, तर ‘नंदा देवी’ वडीनार बंदरात पोहोचले. ‘नंदा देवी’ हे जहाज सुमारे ४६,५०० मेट्रिक टन गॅस घेऊन आले होते. वडीनार बंदरात या गॅसचे दुसऱ्या जहाजात हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असून, हा साठा पुढे देशाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरांकडे पाठवला जाणार आहे. jag-ladki-tanker-arrives-at-gujarat-port दर तासाला सुमारे १,००० टन या वेगाने ही प्रक्रिया पार पडत असून, ती पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारतासाठी ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे या घडामोडींमधून स्पष्ट होत आहे.
Powered By Sangraha 9.0