अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या वृद्धाला 20 वर्षे कारावास

18 Mar 2026 14:34:24
अनिल कांबळे
नागपूर, 
raping minor girl घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीला घराच्या छतावर नेऊन बलात्कार करणाऱ्या 65 वर्षीय वृद्ध आराेपीला विशेष सत्र न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, दहा हजार रुपये दंड ठाेठावला आणि दंड न भरल्यास आराेपीला सहा महिने अतिरिक्त कारावास भाेगावा लागेल, असे स्पष्ट केले. न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी हा निर्णय दिला.
 
 

raping minor girl 
 
माेहम्मद इद्रीस माेहम्मद रशीद शेख (65) असे आराेपीचे नाव असून ताे यशाेधरानगर येथील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी दहा वर्षे वयाची हाेती. 11 जुलै 2023 राेजी रात्री 9 च्या सुमारास आराेपीने मुलीला घराच्या छतावर नेले व तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. मुलीने पालकांना आराेपीने केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर आराेपीविरुद्ध तक्रार नाेंदवण्यात आली. पाेलिसांनी आराेपीला 12 जुलै राेजी अटक केली. सहायक पाेलिस निरीक्षक मेघा गाेखरे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात खटला दाखल केला. त्यात सरकारच्या वतीने अ‍ॅड. कल्पना पांडे यांनी बाजू मांडली. त्यांनी विविध ठाेस पुराव्यांच्या आधारावर आराेपीवरील गुन्हे सिद्ध केले. आराेपी वृद्ध हा पीडीत मुलीच्या वडिलाचा मित्र असून ताे विकृत स्वभावाचा आहे.
Powered By Sangraha 9.0