नागपूर,
Smita Joshi Johare कवयित्री स्मिता जोशी जोहरे लिखित व स्वयंप्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘स्पर्श’ हा मराठी वृत्तबद्ध काव्यसंग्रह दि. २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नवदृष्टी सभागृह, बी. आर. मुंडले शाळा, नागपूर येथे प्रकाशन सोहळ्यात सादर केला जाणार आहे. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानावर जेष्ठ कवयित्री आणि गझलकार आशा पांडे राहतील. तर कवयित्री व गीतकार जयश्री अंबासकर या काव्यसंग्रहावर भाष्य करतील.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र