एलपीजीचा वापर बंद

धुळे जिल्ह्यातील तीन गावांचा ऐतिहासिक निर्णय

    दिनांक :18-Mar-2026
Total Views |
धुळे
LPG आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. यावर धुळे जिल्ह्यातील तीन गावांनी आपल्या पद्धतीने तोडगा शोधून काढला आहे. येथील तीन गावांनी पुढील सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
LPG 
LPG धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या तीन गावांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. यासाठीच्या विशेष बैठकीत तिन्ही गावातील ग्रामस्थ, सरपंच आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.
LPG गावकèयांकडे पारंपरिक चुली, लाकूड, गोवèया यासारखे पर्याय उपलब्ध असल्याने त्यांनी शहरातील बांधवांच्या सोयीसाठी हा निर्णय स्वीकारला आहे. देशासाठी थोडा त्याग करण्याची हीच वेळ आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवाय गावांमध्ये पर्यायी इंधन स्रोतांचा योग्य वापर कसा वाढवायचा याबाबत बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याचेही ठरविण्यात आले.