जिव्हाळा महिला मंडळाच्या सांस्कृतिक संध्येचा उत्साह

18 Mar 2026 15:43:09
नागपूर,
Jivhala Mahila Mandal नागपूर येथील श्रीनगर सुयोग नगरमध्ये स्थानिक जिव्हाळा जेष्ठ नागरिक महिला मंडळ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक संध्या महात्मा फुले उद्यानामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात प्रभाग ३५ च्या नगरसेविका विशाखा मोहोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. जिव्हाळा मंडळाच्या चमूने मान्यवरांचे स्वागत गीतेतून केले, तर प्रमुख अतिथींना तुळशीची रोपटी देऊन अध्यक्ष माधवी रागिनवार यांनी सत्कार केला. तसेच मंडळातील ज्येष्ठ सदस्य शारदा कुंटे, सरोज काळे, उषा चिमलवार, प्रतिभा अंतुरकर यांचाही सत्कार विशाखा मोहोड यांच्या हस्ते करण्यात आला.
 
Jivhala Mahila Mandal
 
प्रमुख अतिथी विशाखा मोहोड यांनी महिला दिनाचे महत्त्व प्रतिपादित करून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना व प्रोत्साहक संदेश उपस्थितांना दिले. Jivhala Mahila Mandal मुख्य भाषणानंतर श्री गणेश वंदना सादर करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ महिला सदस्यांनी रंगीबेरंगी वेशभूषा आणि संगीतासह कोमल है कमजोर नही, मिले सुर मेरा तुम्हारा, अरे संसार संसार यासारख्या गीतांवर आकर्षक नृत्य सादर केले. तसेच वैयक्तिक नृत्य व लावणीच्या प्रस्तुतींनी उपस्थितांची मने जिंकली.
 
कार्यक्रमात जिव्हाळा मंडळाच्या सदस्यांची मोठी उपस्थिती होती, तसेच उद्यानातील नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमास मंडळाच्या अध्यक्षा माधवी रागिनवार, मंजिरी शास्त्री, शैलजा बेलूर, स्मिता गव्हाणे आणि मान्यवर पदाधिकारी व सदस्यांचे मोलाचे योगदान लाभले. Jivhala Mahila Mandal कार्यक्रमाचे संचलन शुभांगी मराठे व शैलजा बेलूरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उषा खाटे यांनी केले. यशस्वीतेसाठी नीलिमा वटीवार, अश्विनी गुंघे, एकता मुले, इंदूताई अंभोरे आणि इतर सदस्य व ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या डॉ. मंगला गावंडे उपस्थित होत्या.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0