नागपूर,
womens honor ceremony महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर शहर तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त "महिला सन्मान सोहळा" दिनांक ८ मार्च २०२६ रोजी लोकांची शाळा, सिरसपेठ, नागपूर येथे थाटात पार पडला. रंजना कावळे (अध्यक्ष, प्राथमिक विभाग) यांनी प्रास्ताविक करत परिषदेची भूमिका स्पष्ट केली. मीनल गाणार यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्त्या गौरी बेलन (संचालिका, योगायोग विवाह संस्था व कुटुंब समुपदेशक) यांनी स्त्रियांना स्वसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले तसेच “उंच भरारी घेतली तरी संसार सोडू नका” असा सुसंस्कृत सल्ला दिला.

डॉ. तृप्ती गावंडे (सीनियर फिजिओथेरपीस्ट) यांनी स्नायूंच्या मजबूतीसाठी नियमित व्यायाम व फिजिओथेरपीचे महत्त्व प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले. राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी यांनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परिचय देत अभिमान व्यक्त केला. womens honor ceremony प्रमुख अतिथी रजनी राजूरकर (मुख्याध्यापिका, लोकांची शाळा) यांनी स्त्रियांच्या महत्त्वावर भर देत सांगितले, “जेथे स्त्रियांचा सन्मान होतो, तेथेच परमेश्वर वास करतो.” डॉ. मनिषा कोलारकर यांनी आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी यांच्या जीवनातील प्रसंग सांगून “देतो तो देव, राखतो तो दानव” या युक्तीसह प्रेरक मार्गदर्शन केले. अध्यक्षा डिंपी बजाज (नागपूर शहर महिला आघाडी प्रमुख) यांनी आध्यात्मिक व पौराणिक कथा, तसेच सुंदर कविता सादर करून महिलांच्या वर्तमान स्थितीवर विचार मांडले.
परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले, तर राणी सेलोकर यांनी स्त्रीशक्तीवर आधारित गीत सादर केले. सुरोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अल्पोपहारानंतर सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. womens honor ceremony याच प्रकारे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी पंडित नेहरू हायस्कूल, जगदीश नगर, काटोल रोड येथे समाजसेविका, नगरसेविका आणि शिक्षिका यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.
सौजन्य: गौरी बेलन, संपर्क मित्र