एलपीजी गॅस सिलेंडरची प्रतीक्षा संपणार

18 Mar 2026 19:00:17
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
lpg-gas-cylinders : मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पृष्ठभूमिवर यवतमाळ जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) व इंडियन ऑईल (आयओसीएल) या तीनही कंपन्यांच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या वितरकांची जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.
 
 
 
y18March-Aadhava
 
 
 
जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध असून नागरिकांना बुकिंगनंतर लवकरात लवकर ‘फर्स्ट इन फर्स्ट आऊट’ ऑर्डरनुसार सिलेंडर उपलब्ध होईल. तसेच गॅस एजन्सीवर गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टिम लागू करावी तसेच बुकिंगनंतर 8 दिवसांच्या आत ग्राहकाला सिलेंडर उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
 
 
जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध असून त्याचा नियमित व सुरळीत पुरवठा करण्यात येईल. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन तसेच ऑईल कंपनी मिळून जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडर साठा पुरेसा उपलब्ध राहील याबाबत कटिीबद्ध आहे. त्यामुळे गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वासू ठेवू नये. सिलेंडर वितरणात अडचणी उद्भवल्यास तत्काळ संबंधित तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 
 
दरम्यान जिल्हाधिकारी विकास मीना यांनी एलपीजी गॅस पुरवठ्यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाèयांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात एलपीजी गॅस सिलेंडर तुटवड्याची कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतत दक्ष राहावे. प्रत्येक अधिकाèयाने आपल्या कार्यक्षेत्रात गॅस सिलेंडर पुरवठ्याच्या स्थितीवर बारकाईने आणि सातत्याने लक्ष ठेवावे, असे म्हटले आहे.
 
 
गॅस वितरकांशी नियमित समन्वय साधून मागणी व पुरवठ्याचे निरीक्षण करावे, तसेच आवश्यकतेनुसार तत्काळ दुरुस्तीत्मक उपाययोजना कराव्यात. तसेच गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्या तातडीने सोडवाव्यात, असेही निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0