सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

18 Mar 2026 11:10:50
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur news वाठाेडा परीसरातील माेकळ्या मैदानाजवळ खेळत असताना ताेल जाऊन सांडपाण्याच्या खड्ड्यात पडल्याने सहा वर्षाचा चिमुकल्याचा मृत्यू झाला. वाठाेडा पाेलिस हद्दीतील शारदा नगरात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दानीश अयाज अंसारी असे सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून दगावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. भूखंड क्रमांक 45 जवळच्या माेकळ्या मैदानात दानीश खेळत हाेता. खेळता खेळता त्याचा अचानक नाल्याच्या काठावर गेला.
 
 
सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
 
 
परिसरातील नाल्याचे पाणी या खड्यात जमा झालेले हाेते. घाण पाणी नाका-ताेंडात गेल्याने श्वास गुदमरून दानीशचा मृत्यू झाला. दाेन तास झाले तरी खेळत असलेला दानिश दिसत नसल्याने कुटुंबाने शाेधाशाेध केली असता ताे खड्यात पडल्याचे दिसले. सायंकाळी सहाच्या सुमारास वाठाेडा पाेलिसांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयाेला रवाना केला.nagpur news या प्रकरण तुर्तास आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. मात्र, दानीशच्या मृत्यूला मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आराेप नातेवाईकांनी केला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0