तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
balasaheb-mangulkar : विकासाच्या नावाखाली निव्वळ यवतमाळ शहरात बोगसपणा सुरू आहे. यवतमाळ नगर परिषदेमध्ये निविदा प्रक्रियेत आणि प्रशासकीयमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. तसेच पालिकेत 465 कोटींचा भ्रष्टाचार झाला असून दोषी मुख्याधिकाèयांसह नगर अभियंत्याला निलंबित करावे, अशी मागणी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी मंगळवार, 17 मार्चला विधानसभेत केली.
देवकरण प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, घंटागाडी, नालेसफाई, अग्निशमन दल, बांधकाम या सर्व कामाच्या पद्धतीत नियमबाह्य प्रक्रिया राबविणे सुरू आहे. मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी या कामासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय मान्यता तांत्रिक मंजुरी पूर्ण न करता पुढे नेली, असे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे.
हा निष्काळजीपणाच असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. रस्ते आणि गटार दुरुस्तीसाठी 9 कोटी दिले आहेत. ह्या पैशांचा हिशोबसुद्धा अद्याप लागलेला नाही. या अधिकाèयांच्या विरोधात डीपीसीमध्ये ठराव झालेला आहे. मुख्याधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, पालकमंत्री संजय राठोड यांनी डीपीसीमध्ये तसा ठराव केला आहे. एक वर्ष झाले असून हक्कभंग दाखल केलेला आहे. तरीही अद्याप काहीच उत्तर नाही.
मनमानीप्रमाणे या नगर परिषदेमध्ये कारभार सुरू आहे. जवळपास 465 कोटींचा भ्रष्टाचार रस्त्यामध्ये झालेला आहे. नगर परिषद मुख्याधिकारी आणि शाखा अभियंता गवई या दोघांनाही तत्काळ निलंबित करावी, अशी मागणी आ. मांगुळकर यांनी केली.
सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करावी, त्याची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, नियमबाह्य निविदेमध्ये आर्थिक गैरव्यवहार करणाèया अधिकाèयांवर कारवाई करण्यात यावी, शहरातील अपूर्ण रस्ते आणि खोदकामे केलेली रस्ते पूर्ण करण्याचे आदेश देऊन कालमर्यादा जाहीर करावी, मुख्याधिकारी आणि नगर अभियंता गवई यांना तत्काळ निलंबित करून कारवाई करा, अशा मागणी आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी केली.