भारताविरोधी कटाचा संशय: अमेरिकन नागरिक अटकेत

19 Mar 2026 15:08:47
नवी दिल्ली,
American citizen arrested in India भारतात एका अमेरिकन नागरिकाच्या अटकेमुळे सुरक्षा यंत्रणांना मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. मॅथ्यू व्हॅन डायक याला भारताविरोधातील कथित कटाच्या संशयावरून अटक करण्यात आली असून तो अटक झालेल्या परदेशी नागरिकांपैकी एक आहे. राष्ट्रीय तपास संस्था यांच्या माहितीनुसार, त्याने भारतामार्गे म्यानमारमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून तेथील सशस्त्र गटांना तसेच भारतातील काही बंदी घातलेल्या संघटनांना प्रशिक्षण दिल्याचा संशय आहे.
 

American citizen 
 
तपासादरम्यान त्याच्या दूरध्वनी आणि सामाजिक माध्यमांतील माहितीची छाननी करण्यात आली असता, तो विविध देशांतील संघर्षांमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले. बंडखोर गटांना प्रशिक्षण देणे आणि स्थानिकांना लढाईसाठी तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट असल्याचेही उघड झाले आहे. ड्रोनचा वापर आणि आधुनिक युद्धतंत्राचे प्रशिक्षण देण्यात तो पारंगत असल्याची माहिती समोर आली आहे.
 
त्याच्या अटकेमुळे ईशान्य भारतातील सशस्त्र जाळ्यांशी त्याचे संबंध होते का, तसेच भारताचा वापर वाहतुकीसाठी केला जात होता का, याचा सखोल तपास सुरू आहे. स्वतःला सुरक्षा विश्लेषक आणि माहितीपट निर्माते म्हणून ओळख देणाऱ्या या व्यक्तीचा भूतकाळही संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून तपास यंत्रणा अधिक खोलात जाऊन चौकशी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0