वाशीम,
vitthal khadse शहरात खळबळ उडवून देणार्या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मुरुमाच्या ढिगार्यात तुकड्या-तुकड्यांत सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटली असून, विठ्ठल कुंडलिक खडसे (वय ३२) रा. देवठाणा, ह.मु. रा. पंचाळा, जि. वाशीम असे मृतकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर असे की, १७ मार्च रोजी रात्री मुरुमाच्या एका ढिगार्यात कापलेले मानवी अवयव सापडल्याने संपूर्ण वाशीममध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी रात्रीच घटनास्थळ गाठून शोध सुरू केला. त्यानंतर १८ मार्च रोजी सकाळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पुन्हा शोधमोहीम राबवली. यावेळी शेजारीच असलेल्या दुसर्या मुरुमाच्या ढिगार्याखाली गाडलेले विठ्ठल खडसे यांचे संपूर्ण शरीर आढळून आले. मृतदेहाची अवस्था पाहता आरोपींनी अतिशय थंड डोयाने आणि क्रूरपणे ही हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुरुमाच्या ढिगार्याचा वापर करण्यात आला होता.vitthal khadse विठ्ठल याची हत्या नक्की कुठे झाली आणि मृतदेह या ठिकाणी कसा आणला, याचा शोध आता पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. विठ्ठल खडसे यांची हत्या कोणत्या कारणातून झाली, यादृष्टीने जुन्या वादांची पडताळणी सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयितांचा माग काढला जात आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले असून हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. वाशीम शहर, ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त पथके वेगवेगळ्या दिशांनी तपास करत आहेत.