एम जी हेटर कारमधून गुरांची चोरी; टोळी जाळ्यात

19 Mar 2026 19:09:29
वर्धा,
Bull theft, MG Hector car, महागड्या गाडीने गुरांची चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने नागपूर येथून अटक केली. त्यांच्या ताब्यातून एम जी हेटर ही महागडी कार, रोख, असा १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 

Bull theft, MG Hector car, 
देवळी येथील आशिष माहुरे (३३), मारोती झाडे, नरहरी कामडी, मंगल तलमले, शंकर कामडी यांची प्रत्येकी १ गाय आणि प्रज्वल पाचपोर यांचा १ गोर्‍हा अशी ६ जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूर येथे तपास करीत होते. यशोधरा नागपूर येथील अब्दुल अलीम अब्दुल लतीफ हा एम जी हेटर या महागड्या गाडीने सहकार्‍यांसह शिवनीकडून नागपूरकडे येत आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी कळमना पुलाजवळ नाकाबंदी करून एम. एच. ४७- ए. यू. ५३६६ क्रमांकाच्या कारची पाहणी केली. कारमध्ये अब्दुल अलीम अब्दुल लतिक (३९) रा. यशोधरानगर, मोहम्मद अर्शद मोहम्मद अजगर शेख (३६) रा. यासीन प्लॉट ताज सरोवर मज्जिद, रोशन उईके (२६) रा. कळमना यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांनी देवळी येथून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली. तिघांना अटक केली.
Powered By Sangraha 9.0