वर्धा,
Cultural festival सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘घरघर संविधान मेळावा’ या उपक्रमांतर्गत रविवार २२ रोजी सायंकाळी ६ ते १० दरम्यान त्रिरत्न बौद्ध महासंघ बापटवाडी, सानेवाडी रोड येथे संविधानाची ७५ वर्षे आणि महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या ९९ व्या वर्षानिमित्त समतेच्या विचारांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती लोकजागृती संस्थेच्या सदस्य संगीता टिपले यांनी आज गुरुवार १९ स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील लोकप्रिय कलावंत डॉ. अनिरुद्ध वनकर यांच्या नेतृत्त्वाखाली १५ कलावंत सांस्कृतिक जलसा सादर करणार आहेत. ‘शिवराय ते भिमराय’ आणि ‘बुद्ध-भीम गीतांचा जलसा’ या विशेष सादरीकरणामधून संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचे विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका Cultural festival डॉ. कोमल धांडे, नेहा गाडे तसेच लातूर येथील धम्मजित लिगोटे यांच्यासह नामांकित कलावंतांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाला संविधानप्रेमी नागरिक, युवक-युवती, कलावंत आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टिपले यांनी केले. पत्रकार परिषदेला सुहास नगराळे उपस्थित होते.