कतार,
India hit by Iran attack मध्यपूर्वेतील तणावाचा थेट परिणाम भारतावर जाणवू लागला आहे. इराण कडून कतार मधील रास लाफान येथील महत्त्वाच्या वायू प्रकल्पावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारताकडे येणारा वायू पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. या घटनेमुळे भारताच्या एकूण आयातीपैकी सुमारे वीस टक्के पुरवठ्यावर परिणाम झाला असून ऊर्जा सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
भारत मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून असल्याने अचानक निर्माण झालेल्या टंचाईचा फटका वीज निर्मिती आणि खत उद्योगांना बसण्याची शक्यता आहे. पुरवठा सुरळीत झाला नाही तर काही भागांत वीजटंचाई आणि औद्योगिक कामकाजात अडथळे निर्माण होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सरकारने घरगुती वापरासाठी वायू उपलब्ध ठेवण्यासाठी उद्योगांना दिला जाणारा पुरवठा मर्यादित करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे सागरी वाहतूकही धोक्यात आली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने इतर देशांकडून तातडीने वायू खरेदी करण्याचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली असून ऊर्जा संकट टाळण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत.