आगामी सणोत्सव शांततेत व नियमांचे पालन करून साजरे करा : पोनि राजेश खेरडे

19 Mar 2026 18:17:43
मालेगाव,
Malegaon, आगामी येणारे सर्व सण व उत्सव हे सर्वांनी शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करावे. सणोत्सव साजरा करताना नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांनी त्यांनी आवाहन केले. ते मालेगाव येथे आयोजित शांतता कमिटी सदस्याच्या सभेत बोलत होते.
 

Malegaon,  
मालेगाव पोलि स विभागाच्या वतीने आगामी सणोत्सव लक्षात घेता शांतता समिती सदस्यांची सभा घेण्यात आली. १८ मार्च रोजी पोलिस स्टेशन च्या प्रांगणात आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ओमप्रकाश खुरसडे हे होते तर या सभेला पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांची उपस्थिती होती. आयोजित शांतता समिती सभेत डॉ. विवेक माने, सेवानिवृत्त शिक्षक झिया अहेमद, माजी उपसरपंच शिक्षक सय्यद आयुब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना येणारे सर्व सण हे मालेगाव शहरातील नागरिक शांततेत पार पाडतील असे सांगताना सण उत्सव साजरा करताना सर्वांनी एकमेकांना सहकार्य करावे तसेच पोलिसांनी सुद्धा सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
नगराध्यक्ष ओम प्रकाश खुरसडे यांनी आपल्या भाषणातून सण उत्सव सर्वांनी उत्साहात साजरा करावा असे सांगताना उत्सवाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक राजेश खेरडे यांनी येत्या काही दिवसात रमजान ईद, श्रीराम जन्मोत्सव, महावीर जयंती, हनुमान जन्मोत्सव यासह बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सर्व सणोत्सव समाज बांधवांनी उत्साहात व शांततेत साजरे करावे. सणोत्सव साजरा करताना मात्र नियमाचे पालन करावे तसेच डीजे चे कर्णकर्कश आवाजावर नियंत्रणात ठेवून मिरवणुकीत असलील गाणी वाजवू नये त्याचप्रमाणे अथवा वर विश्वास ठेवू नये.
कार्यक्रमाचे संचालन, प्रस्ताविक व आभार प्रदर्शन गोपनिय विभागाचे पोलिस कर्मचारी विष्णू मुसळे यांनी केले.
Powered By Sangraha 9.0