तथाकथित हवामान तज्ञांच्या सल्ल्यामुळे शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली

19 Mar 2026 18:16:12
मानोरा,
Manora, taluka तालुयातील एका खेडेगावात राहणारे व स्वतःला हवामान तज्ञ समजणार्‍या व्यक्तीकडून दर दिवशी तालुयातील असंख्य ग्रुप वर समाज माध्यमाद्वारे हवामानाचा अंदाज वर्तवून शेतकर्‍यांना अडचणीत टाकणार्‍यावर तालुका आपत्ती निवारण प्राधिकरण का कारवाई करीत नाही असा सवाल या तथाकथित हवामान तज्ञाच्या उठसूट हवाई अंदाज समाज माध्यमावर प्रसारित करण्याच्या प्रकरणावरून विचारल्या जात आहे.
 

Manora, taluka disaster management, 
मनोरा सर्व बाबतीत माघारलेला तालुका असून, या तालुयातील बहुतांश नागरिकांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. जवळपास पाच हजार हेटर शेत शिवारामध्ये रब्बी गव्हाची शेतकर्‍यांनी यावेळी केलेली आहे. अशातच तालुयातील एका स्वयंभू हवामान तज्ञाद्वारे समाज माध्यमावर १८ मार्च रोजी तालुयात मोठ्या प्रमाणात गारपीट होईल असा हवाई हवामान अंदाज व्यक्त करून तो तालुयातील समाज माध्यमांच्या असंख्य ग्रुप वर प्रसारित करण्यात आला ज्याचा भुर्दंड तालुयातील असंख्य शेतकर्‍यांना सोसावा लागल्याचे बोलले जात आहे.
विदर्भात नागपूर येथे प्रादेशिक हवामान केंद्र आहे या केंद्राद्वारा मानोरा तालुयामध्ये गारपीट होईल अशा प्रकारची कुठलीही सूचना अथवा इशारा देण्यात आलेला नसताना उठसूट हवामानाचे चुकीचे अंदाज वर्तवून भोळ्या शेतकर्‍यांना धावपळ करण्यास भाग पाडणार्‍या उपरोक्त तथाकथित हवामान अंदाज वर्तवणार्‍यावर तालुका आपत्ती निवारण प्राधिकरणाने शेतकर्‍यांना भ्रमित करून अडचणीत आणण्या बाबत कारवाई करण्याची मागणी या अंदाजाच्या आधारे अडचणीत सापडलेल्या काही शेतकर्‍यांनी आपले नाव न सांगण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.
१८ तारखेला गारपीट होणार या अंदाजावर विसंबून रब्बी गहू उत्पादक शेतकर्‍यांनी हार्वेस्टर मशीन मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात धावपळ केली तर काही शेतकर्‍यांनी हार्वेस्टर धारकांना अवाच्या सव्वा पैसे देऊन आपल्या अपरिपक्व गव्हाची कापणी करून घेतल्याचा प्रकार सुद्धा यामुळे घडल्याच्या चर्चा तालुयात आहेत. गारपीट होईल आणि शेतशिवारातील हाता तोंडाला आलेले मात्र ज्याला काही आठवड्याची कापणी करण्याला अवधी आहे असे गव्हाचे पीक सुद्धा शेतकर्‍यांनी भीतीपोटी कापून घेतल्यामुळे अशा ओलसर व बारकूळ गावाला बाजारात दर मिळणार नसल्यामुळे शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे याची जबाबदारी कोणाची हे व असे अनेक प्रश्न या निमित्याने निर्माण झालेले आहेत. हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी शासनाचा एक विभाग कार्यरत असताना व कुणी मागणी केली नसताना उठसूट हवाई अंदाज वर्तवून शेतकर्‍यांना नुकसानीला कारणीभूत ठरणार्‍या तालुयातील अशा तथाकथित हवाई तिर सोडणार्‍या व शेतकर्‍यांच्या नुकसानीत कारणीभूत ठरणार्‍या तिरंदाजांना तालुका आपत्ती निवारण प्राधिकारी (तहसीलदार) तथा कृषी विभागाने योग्य ती कारवाई करून आवरावे अशी मागणी या निमित्याने आता जोर धरीत आहे.
समाज माध्यमांवर चुकीची हवामान विषयक माहिती प्रसारित करून भोळ्या शेतकर्‍यांना अडचणीत आणणार्‍यांवर सायबर अधिनियमानुसार योग्य ती कारवाई करण्याची गरज सुद्धा निर्माण झाली असल्याचे उपरोक्त प्रकारावरून पुढे येत आहे.
Powered By Sangraha 9.0