उन्हाळ्यात ऊसाच्या रसाला नागरिकांची पसंती

19 Mar 2026 18:33:19
मंगरूळनाथ,
Sugarcane juice, यावर्षी मार्च महीन्यातच जीवाची लाही लाही करणारे उन्ह तालुयातील ग्रामीण व शहरी भागात आपल अस्तित्व दाखवित आहे, त्यामुळे देशभरातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. उन्हाळा वाढला तरी कामानिमित्त सगळ्यांना बाहेर जावेच लागते. अशावेळी सगळ्यात पहिल्यांदा आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या ऊसाच्या रसाची आठवण येते. उन्हाळा सुरु झाला की ऊसाच्या रसाची मागणी वाढते. ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातसुद्धा ऊसाच्या रसाला मोठी मागणी आहे.
 

Sugarcane juice 
उन्हाळ्यात इतर थंड पेय पिण्यापेक्षा ऊसाचा ताजा रस पिल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. त्यामुळे आता मंगरूळनाथ शहरासह ग्रामीण भागात ही ऊसाच्या रसाची मागणी वाढली आहे या दिवसांमध्ये महागडे पेय पिण्यापेक्षा ऊसाचा रस पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. कोल्ड्रिंक, आइस्क्रीम हे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा रस पिण्यासाठी आवडतो. मात्र कोरोना सारख्या रोगराईचे काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले होते. संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अनेकांनी स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली. पुन्हा एकदा सगळीकडे रसवंतीगृहे सुरु झाली असून, ग्राहक वाढण्यासाठी आगळी शक्कल रसवंती धारकांनी लढविली रसवंती व्यावसायिकांनी रसवंती गृहाच्या बाहेर स्पीकरद्वारे घुंघराचा आवाज सतत सुरु ठेवला आहे. तर काहींनी लहानशा इलेट्रीकल मोटार द्वारे घुंगरूचे आवाज सुरु केले आहेत.त्यामुळे ग्राहकांचे पाय आपसूकच रसवंतीगृहाकडे वळत आहेत. घुंगरूंच्या आवाजामुळे ग्राहकांना समजून येत आहे की येथे रसवंती गृह आहे.
वाशीम जिल्ह्यातील तालुयामध्ये ऊसाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. शेतामध्ये पिकवण्यात आलेला ऊस हा जिल्ह्यातील रसवंती व्यवसायिकांना विकुन दरवर्षी ऊस उत्पादक शेतकरी लाखोंची उलाढाल करतात. ऊसाचा रस शरीरासाठी थंड आणि गुणकारी असतो. या रसामुळे शरीरातील शक्ती वाढत जाते. तसेच शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते. एक ग्लास ऊसाच्या रसात बर्फ किंवा अन्य काहीही न टाकता पिल्यास तो अधिक हितावह असतो अशी अनेकांची मान्यता आहे.
Powered By Sangraha 9.0