*वाहनासह ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा,
कत्तलीकरिता घेऊन जात असलेल्या 'cows' rescued वाहनातील ४३ गोवंशाची सुटका करत वाहनासह ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली. समुद्रपूर पोलिसांचे पथक गस्त करत असताना कत्तलीकरिता गोवंश घेऊन जाणारे वाहन कार्यकर्त्यांनी आरंभा टोल नाका परिसरात थांबवून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एम.एच. ३४ बी.झेड. ७६९८ क्रमांकाच्या वाहनाची पाहणी केली असता त्यात ४३ गोवंश जीवंत तर तीन जनावरे मृतावस्थेत आढळली.
'cows' rescued पोलिसांनी वाहनासह गोवंश जनावरे ताब्यात घेत ४१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सरगम गुलाबसिंग धुर्वे रा. सालई मध्यप्रदेश, इमरान कुरेशी रा. गडचांदूर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवतकर यांच्यासह पोलिस पथकाने केली. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.