मुद्रपुरातील ३० गावांमध्ये पाणी; खाजगी विहरींचे अधिग्रहण

02 Mar 2026 21:20:58
*टप्पा दोनमध्ये ५० तर तीन मध्ये ३० गावांमध्ये कामं प्रस्तावित
समुद्रपूर, 
तालुयातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यासंबंधी Sameer Kunawar आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन पंचायत समितीच्या सभागृहात १९ जानेवारीला करण्यात आले होते. या आढावा बैठकीत ३० गावांमध्ये पाणी टंचाईवर उपाय म्हणून खाजगी विहिरींचे अधिग्रहणाच्या मागणीचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पाणी टंचाई टप्पा दोनमध्ये ५० तर तीनमध्ये ३० गावांमध्ये कामं प्रस्तावित करण्यात आली आहेत.
 
 
sameer
 
उन्हाळ्यात कोणत्याही गावात पाण्याची कमतरता भासू नये अशा सत सुचना आ. कुणावार यांनी दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने पंचायत समिती व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कामाला लागले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत ज्या गावांमध्ये कामं पूर्ण झाली. त्यापैकी रासा, तावी, केसलापार सह अनेक गावं टंचाई मुत झाली तरी देखील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरी जावे लागेल आहे. दर वर्षी पाणी टंचाई संबंधी आढावा बैठक आयोजित करुन कुटे तात्पुरते तर कुठे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर उपयोजना करण्यात येत असली तरी देखील समुद्रपूर तालुका टंचाई मुत झाला नाही. तालुयातील अनेक गावांमध्ये मे व जून महिन्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. येत्या काही दिवसात ३० गावामध्ये विहीर अधिग्रहण करून पाणी टंचाईवर तात्पुरती उपाययोजना करण्यात येणार आहे.
 
 
Sameer Kunawar पाणी टंचाईवर उपयोजना योजना म्हणून जाम येथे ४ व वायगाव (हळद्या) २ ठिकाणी, तर आरंभा, सांवगी, बर्फा, लाहोरी, धुमणखेडा, पारोधी, उब्दा, सिल्ली, कोरा, हिरडी, मुरादपुर, वासी, शेगाव(गो), नंदोरी, नारायणपूर, उसेगाव, धामगाव, खुर्सापार, दौलतपूर, पिपरी, मोहगांव तर तिसर्‍या टप्प्यात अंतरगाव, परसोडी, नारायणपूर या गावांचा समावेश आहे. आपण आमदार झालो त्यावेळी समुद्रपूर तालुयातील मोठ्या प्रमाणात गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. यावेळी आपण विविध योजनांच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आणून त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन घेतली सोबतच अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन योजना मजूर करुन स्वतंत्र काळापासून पाण्यासाठी भटकंती करावे लागत असलेल्या तालुयातील तावी, रासा, केसलापार या गावांसह अनेक गावं टंचाई मुत झाली आहे. काही गावात उन्हाळ्याच्या दिवसात टंचाई निर्माण होत असून याठिकाणी सुद्धा पाणी पुरवठा नवीन विहीर, जलवाहिनी, टाकीचे कामं सुरू असून हर घर नल हर घर जल मिळावे. त्या गावांना सुद्धा टंचाई मुत करण्याचे माझे स्वप्न असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0