देववाडी गावाजवळील जंगलात भीषण आग

02 Mar 2026 19:55:02
दोन मजुरांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टाळला
आष्टी (श.), 
'Fire in the forest' तालुयातील इंदरमारी परिसरात सारवाडी गावाच्या देववाडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ६ ला लागून असलेल्या जंगलाला १ रोजी दुपारी १ वाजता भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की शेतशिवाराला आपल्या कवेत घेणार असल्याची भीती पसरली. त्यातच काही अंतरावरच पारधी तांडा वस्ती हे गाव सुद्धा होते. परंतु, दोन मजुरांनी वेळीच आग विझविण्याचे यंत्र घेऊन घटनास्थळी धाव घेऊन आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला.
 
 

aag
 
तालुयातील तळेगाव (श्या. पं.) वनविभागांतर्गत येणार्‍या जंगल परिसरात १ रोजी दुपारी १ वाजता अचानक आग लागली. तळेगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत येणार्‍या इंदरमारी गावाच्या भागात काही अंतरवार देववाडी गावाच्या शिवेवर अज्ञात व्यतीने आग लावली. दुपारची वेळ असल्यामुळे आग धगधगत देववाडी गावाच्या परिसरात आली. तेथून काही अंतरावर शेतशिवार होता तर काही अंतरावर पारधी तांडा वस्ती होती. आगीने रौद्र रूप केल्याने जंगलात आगीचे काळे लोळ आकाशात दिसत होते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे वनविभागाचे बिट गार्ड व वनपाल हे आपल्या गावाकडे निघून जातात. त्यामुळे जंगल हा रामभरोसे असतो. आग लागताच जंगलातील वन्य प्राणी जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळून गेले. आगीचे लोळ पाहून दोन मजूर आगीच्या दिशेने धावून आले. मात्र, वनविभागाचे कर्मचारी कुणीच उपस्थित नव्हते. दोन मजुरांनी आग विझविण्यासाठी जीवाचे रान केले आणि अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
 
 
'Fire in the forest' सध्या उन्हाळा तापू लागल्याने जंगल परिसरात आग लागण्याच्या घटना घडतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बिट गार्ड व वनपाल यांनी सुट्टीच्या दिवशी गस्त देणे गरजेचे आहे. नेमकी सुट्टीच्या दिवशी आग लागण्याच्या घटना घडतात. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
Powered By Sangraha 9.0