...अन्यथा आदर्श शिक्षक पुरस्कार परत करणार

02 Mar 2026 19:59:59
प्रहार शिक्षक संघटनेचा इशारा
 
वर्धा, 
समाजाची नि:स्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणार्‍या तसेच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांना adarsh shikshak puraskar आदर्श शिक्षक पुरस्कार शासनाकडून देण्यात येतात. असाच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१-२२ मध्ये प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग सचिव गजानन कुरवाडे, संघटनेचे विभाग पदाधिकारी राजकुमार तिरभाने यांना शासनाच्या वतीने प्रदान करण्यात आला. परंतु, शिक्षण क्षेत्रातील भययुत वातावरण लक्षात घेता हा पुरस्कार शासनास परत करण्याचा इशारा नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला. हा निर्णय नागपूर विभागाच्या संघटनेच्या सभेत घेण्यात आला.
 

shikshsk 
 
सध्या शिक्षकांच्या नोकर्‍या सुरक्षित व भयमुत नाही, विद्यार्थ्यांचे भवितव्यही सुरक्षित नाही. राज्यभरात शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना व वैफल्यग्रस्त वातावरण निर्माण झालेले आहे. १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुदानित शाळा पूर्णतः कोलमडून गेल्या आहे. शेकडो शाळा या शासन निर्णयानुसार बंद पडणार असून हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडणार आहे. हा शासन निर्णय बालकांचा मोफत व सतीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाचा भंग करणारा आहे.
 
adarsh shikshak puraskar  सरसकट टीईटी बंधनकारक करणे शिक्षकांच्या आयुष्याशी खेळ करणारा निर्णय असून कार्यरत सर्व शिक्षकांना संरक्षण दिले पाहिजे. कोणत्याही शिक्षकाच्या नोकरीवर गदा येणार नाही, अशी कृती शासनाने करावी. भारतभर जुन्या पेन्शनबाबत आक्रोश असतानादेखील शासन पेन्शनच्या मुद्यावर ‘ब्र’ही काढायला तयार नाही. राज्यात १ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुत २६ हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी बरेच सेवानिवृत्त झाले असून बरेच मृत्यू पावले आहेत. शिक्षकांना सातत्याने अशैक्षणिक कामात जुंपवून ठेवणे सुरू आहे. अशैक्षणिक कामे पूर्णतः काढून घेतली पाहिजे. भ्रष्ट अधिकारी व काही संस्थाचालक सातत्याने शिक्षकांचे शोषण करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी सातत्याने वाढत चाललेला आहे. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर, नागपूर विभाग सचिव गजानन कुरवाडे, विभाग पदाधिकारी राजकुमार तिरभाने, धनराज कावटे, योगराज ढेंगे, पृथ्वीराज चव्हाण, विजय काळे, बाळनाथ मानकर, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
 
 
adarsh shikshak puraskar राज्यात गेल्या २५-३० वर्षांपासून जवळपास ६० हजार शिक्षक अल्पशा वेतनावर अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करीत आहेत. या सर्व समस्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या आहेत. आंदोलने करूनही दखल घेतल्या जात नाही. शेवटी वैतागुण प्रहार शिक्षक संघटनेनेच्या वतीने हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. शासनाने तात्काळ सदर मुद्यावर सकारात्मक विचार न केल्यास राज्यभर प्रचार प्रसार करून आजपर्यंत ज्यांना-ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, त्या सर्वांना एकत्र करून लवकरच सर्व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक त्यांचे पुरस्कार शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0