रेस्टॉरंटमध्ये डालखिचडीत झुरळ आढळल्याने खळबळ

02 Mar 2026 16:31:19
मुंबई
dal khichdi cockroach inciden उपनगरातील अंधेरी परिसरात एका रेस्टॉरंटमध्ये दिल्या गेलेल्या डालखिचडीत झुरळ आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या खाली असलेल्या हॉटेल अपॉइंटमेंट येथे घडल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. या प्रकारामुळे संबंधित हॉटेलच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

dal khichdi cockroach inciden 
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने कुटुंबासह हॉटेलमध्ये जाऊन जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यात डालखिचडीची ऑर्डर करण्यात आली. जेवताना प्लेटमधील खिचडीत झुरळ आढळल्याचे ग्राहकाच्या निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ हॉटेल कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला.
ग्राहकाच्या म्हणण्यानुसार, घटनेची माहिती देऊनही व्यवस्थापनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. उलट, हॉटेलच्या मॅनेजरने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. “आधी बिल भरा आणि नंतर व्हिडिओ काढा,” असे मॅनेजरकडून सांगण्यात आल्याचा दावा संबंधित ग्राहकाने केला आहे. या वक्तव्यामुळे ग्राहक अधिकच संतप्त झाल्याचे समजते.घटनेनंतर ग्राहकाने dal khichdi cockroach inciden  हा प्रकार सोशल मीडियावर मांडल्याने प्रकरणाची चर्चा रंगली आहे. अन्नपदार्थांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यास ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.दरम्यान, या घटनेबाबत हॉटेल व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. तथापि, या प्रकारामुळे परिसरातील खाद्यव्यवसायिकांच्या स्वच्छतेच्या मानकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, अन्न सुरक्षा विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0