प्राथमिक शिक्षकांकडे सहपरिरक्षकाचे काम नको

02 Mar 2026 21:59:27
प्राथमिक शिक्षक समितीची मागणी
अंजनगाव येथील गैरप्रकाराचे पडसाद
अमरावती,
Anjangaon case फेब्रुवारी ते मार्च महिन्यात दरवर्षी बारावी व दहावीची परीक्षा घेतली जाते. या परीक्षांचे पेपर ठेवण्याकरिता प्रत्येक तालुका स्तरावर सुरक्षितता म्हणून आणि परीक्षा केंद्राला पेपरचे वाटप करण्याकरिता एक परीक्षा व्यवस्थापन कक्ष दिल्या जातो. याला कस्टडी असे म्हणतात. या कस्टडीचा प्रमुख म्हणजेच परिरक्षक म्हणून त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी असतो आणि त्यांना सहकारी म्हणून हे अधिकारी केंद्रप्रमुख किवा प्राथमिक शिक्षकांना सहपरिरक्षक म्हणून नियुक्त करतात. ही परीक्षा जवळपास एक महिना चालते. या शिक्षकांच्या नेमणुकीमुळे त्यांच्या वर्गाचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे या परीक्षेकरिता प्राथमिक शिक्षकांना घेऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
 
 
Samiti
 
दहावी व बारावीची परीक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाव्दारे घेण्यात येते. परीक्षा केंद्राला पेपर पुरविण्याकरिता एका ठिकाणी सुरक्षित कस्टडी तयार करण्यात येते. येथे शिक्षण विभागातील अधिकारी व सहाय्यक यांची नेमणूक असते. नियमानुसार या कस्टडीत सहाय्यक म्हणून एका लिपिकाची व शिपाई यांची नेमणूक करावी लागते; पण शिक्षण विभागातील अधिकारी या कस्टडीत प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करतात आणि घडणार्‍या गैरप्रकाराला बळी पडतात. असे प्रकार घडू नये आणि प्राथमिक शिक्षकांचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने अशा कस्टडीत प्राथमिक शिक्षकांना नेमणुका देऊ नये आणि अशा नेमणुका शिक्षकांनी नाकाराव्यात, असे आवाहन प्राथमिक शिक्षक समितीने केले आहे.
 
 
Anjangaon case नुकताच अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुर्जी येथे पेपरफुटीचा प्रकार घडला. या प्रकरणात प्राथमिक शिक्षकांना दोषी ठरविल्या गेले असून हे प्रशासनाचे बळी आहे. या प्रकरणात प्रभारी गटशिक्षणाधिकारी, प्रभारी प्राथमिक शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यापूर्वी याबाबतची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. प्राथमिक विभागाचे कार्य सोडून माध्यमिक विभागाची कामे प्राथमिक शिक्षकांना का दिली जातात, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
Powered By Sangraha 9.0