नागपूर,
Nagpur Municipal Corporation आज नागपूर महानगरपालिकेचा वर्धापन दिन संजय नगर माध्यमिक शाळेत उत्साहपूर्ण रीतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक नगरसेविका सविता कावरे (सभापती, कर आकारणी समिती), नगरसेविका दुर्गेश्वरी कोसेकर आणि माजी नगरसेवक गेंदरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका गीता दांडेकर होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रास्ताविकाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. Nagpur Municipal Corporation मान्यवरांनी महानगरपालिकेच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती करण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात शाळेसाठी अभिमानाची बाब म्हणजे शिक्षणोत्सव २०२६ मध्ये संजय नगर माध्यमिक शाळेने ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावली. परेड, सामूहिक ड्रिल, खो-खो, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच, फुटबॉल, क्रिकेट तसेच नृत्य व समूहगीत या सर्व स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक मिळवत एकूण चॅम्पियनशिप जिंकली. Nagpur Municipal Corporation या यशामागे क्रीडा प्रशिक्षक वैभव कुंभरे, शुभम कंकाळ, रेखा चव्हाण व अशोक चौधरी यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. त्यांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा मान उंचावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधू पराड यांनी केले तर आभार प्रदर्शन चौधरी सर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य: वैभव कुंभारे, संपर्क मित्र