उत्तरपत्रिका चोरीचा खरा सूत्रधार कोण?

02 Mar 2026 21:50:37
अंजनगाव सुर्जी येथील प्रकरण
 
अंजनगाव सुर्जी, 
येथील सीताबाई संगई विद्यालयातील कस्टडी रूम मधील दहावीच्या इंग्रजी विषयाच्या Answer paper theft case उत्तरपत्रिका चोरीला गेल्याच्या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या ’आक्का’ नावाच्या संशयास्पद पात्राभोवती चर्चेचे मोहोळ उठले आहे. एका बड्या अधिकार्‍यांच्या अटकेनंतर आता खर्‍या सूत्रधारापर्यंत पोलिस पोहोचणार का, असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात आरोपी असलेले प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर अजूनही फरार आहेत, हे विशेष!
 

peper 
 
काय आहे ’आक्का’ कनेक्शन?
अंजनगावच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सध्या एका ’आक्का’ नावाच्या व्यक्तीची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या पेपर चोरीच्या कटाचे धागेदोरे केवळ दोन उत्तरपत्रिकांपुरते मर्यादित नसून, त्यामागे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ’आक्का’च्या वरदहस्तामुळेच इतक्या धाडसाने परीक्षा केंद्रावरून पेपर बाहेर काढण्याचे धाडस अधिकार्‍यांनी केले का? अशी शंका आता उपस्थित होत आहे. पोलिसांनी निष्पक्ष तपास केला, तर या ’आक्का’चे काळाबाजार उघड होऊन अनेक बड्या धेंडांचे पितळ उघडे पडू शकते.
 
 राजकीय दबाव?
Answer paper theft case  दुसरीकडे, या प्रकरणात अडकलेले अधिकारी हे वजनदार असल्याने आणि त्यांचे धागेदोरे थेट राजकीय नेत्यांशी जोडलेले असल्याने, चौकशी होणार की नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस तपासाची दिशा भरकटवण्यासाठी आणि ’आक्का’ला वाचवण्यासाठी राजकीय दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा अंजनगावच्या चौकाचौकात रंगत आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या या गुन्हेगारांना राजकीय अभय मिळणार का? हा खरा कळीचा मुद्दा ठरत आहे.
 
 
गटशिक्षणाधिकार्‍याच्या पोलिस कोठडीत वाढ
पंचायत समिती अंजनगाव सुर्जीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे व त्याचा सहकारी आरोपी अनिल हाडोळे यांना पोलिसांनी अंजनगाव न्यायालयात सोमवारी हजर केले. पोलिसांनी तपासाकरिता पोलिस कोठडी मागितली. न्यायालयाने ४ मार्चपर्यंत दिली आहे. दरम्यान खोडे यांच्या घरून मोबाईल जप्त कण्यात आला आहे. या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे तसेच ठाणेदार सुरज बोंडे तपास करीत आहे.
Powered By Sangraha 9.0