गंभीर जखमी
प्रतीकारात हल्लेखोर ही जखमी
रिसोड,
Attack on former corporator येथील माजी नगरसेवक इरफान कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना आज, २ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता शहरातील मालेगाव नाका येथे घडली. हल्ला झाल्यानंतर इरफान कुरेशी यांनी आपला बचाव करण्यासाठी प्रतिकार केला असता हल्लेखोरही जखमी झाला असून, जखमी अवस्थेत इरफान कुरेशी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता पुढील उपचारासाठी वाशीम येथे रवाना पाठविण्यात आले. अल्ताफ कुरेशी राहणार मोठेगाव ता.रिसोड असे हल्लेखोराचे नाव असून, तो सुद्धा या झटापटीत जखमी झाला असून त्यासही रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.
Attack on former corporator याबाबत माहिती अशी की, २ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता इरफान कुरेशी हे मालेगाव नाका येथे काही कामानिमित्त उभे असतात त्या ठिकाणी अल्ताफ कुरेशी आला. या ठिकाणी दोघांमध्ये काहीतरी वाद निर्माण झाला. प्रथम शाब्दिक चकमक व नंतर झटापटी सुरू झाली. यातच अल्ताफ कुरेशी यांनी त्याच्या जवळील चाकू काढून इरफान कुरेशी यांच्या छातीवर दोन ठिकाणी वार केले. दरम्यान चाकू हल्ला होत असताना इरफान कुरेशी यांनी आपला बचाव करत अल्ताफ कुरेशी याचा प्रतिकार केला. या ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी जमा झाली व दोघांनाही वेगळे करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले इरफान कुरेशी यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सदर घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच इरफान कुरेशी यांचे नातेवाईक मित्रमंडळी व समर्थकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी या ठिकाणी पोहोचून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. इरफान कुरेशी यांचा सध्या स्थितीत अकोला येथे उपचार सुरू आहे. सदर हल्ला का झाला व नेमका वाद काय होता याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही. याबाबत रिसोड पोलीस पुढील कारवाई करीत आहे.