पाकिस्तानी नागरिकांचे ग्रीन कार्ड व व्हिसा रद्द करा

02 Mar 2026 14:29:20
वॉशिंग्टन,
Cancel Pakistani citizens visa इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीवर एक अमेरिकन नागरिकाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. कराची येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर, लॉरा लूमर नावाच्या अमेरिकन कार्यकर्त्याने अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला पत्र आणि सोशल मीडियावर पोस्टद्वारे पाकिस्तानी नागरिकांसाठी ग्रीन कार्ड आणि सर्व व्हिसा निलंबित करण्याची मागणी केली आहे.लूमरने आपल्या पोस्टमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांना टॅग करत म्हटले आहे की, "इराणवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील सर्व व्हिसा आणि ग्रीन कार्ड तातडीने निलंबित करावेत." कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर झालेल्या हिंसाचारामुळे आणि दूतावास ताब्यात घेण्याचा प्रयत्न असलेल्या लोकांच्या मृत्यू व जखमी झाल्याच्या बातमीनंतर ही मागणी केली गेली आहे.
 
 
Cancel Pakistani
 
लूमरने असा दावा केला की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांच्या मृत्युनंतर संतप्त झालेल्या निदर्शकांनी पाकिस्तानातील अमेरिकन दूतावासावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सहा निदर्शकांचा मृत्यू झाला आणि वीस जण जखमी झाले. ती म्हणाली की, अमेरिकन मरीनकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यात आला.मात्र, मृतांची संख्या व गोळीबाराची परिस्थिती स्वतंत्र सूत्रांनी अद्याप पुष्टी झालेली नाही. तसेच ही कारवाई अमेरिकन मरीनने केली की स्थानिक पाकिस्तानी सुरक्षा दलांनी, हेही स्पष्ट नाही.
 
 
लूमरने पाकिस्तानवर तीव्र टीका करत म्हटले की, पाकिस्तान ओसामा बिन लादेनला आश्रय देतो आणि देशात अतिरेकीवादाला प्रोत्साहन दिले जाते. तिच्या मते, पाकिस्तान अमेरिका आणि भारताविरुद्ध हिंसाचारास चालना देतो.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने या मागणीवर अद्याप कोणताही प्रतिसाद दिला नाही. कराचीत अमेरिकन लष्करी कारवायांविरुद्ध सुरू असलेल्या निदर्शनांमुळे शहरात तणाव निर्माण झाला आहे.
Powered By Sangraha 9.0