चिराग पासवान यांची होळी आधी दारूबंदी कायद्याचा आढावा

02 Mar 2026 12:09:13
पटना,
chirag paswan चिराग पासवान यांनी बिहारमधील दारूबंदी कायद्याचा सर्वंकष आढावा घेण्याची मागणी केली आहे. होळीपूर्वी पटना येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, या कायद्यामागील मूळ उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत, याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणे आवश्यक आहे.
 

चिराग पासवान  
 
 
केंद्रीय मंत्री असलेल्या पासवान यांनी सांगितले की, दारूबंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी अंमलबजावणीतल्या त्रुटी ओळखून त्या दूर करणे गरजेचे आहे. “ज्या हेतूने हा कायदा लागू करण्यात आला, ते उद्दिष्ट प्रत्यक्षात पूर्ण होत आहेत का, हे तपासले पाहिजे. तसे नसल्यास उणिवा शोधून त्यावर उपाययोजना केली पाहिजे,” असे ते म्हणाले.
पुनरावलोकनाच्या मागणीचा अर्थ दारूबंदी रद्द करण्याची भूमिका असा काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही धोरणात काळानुरूप बदल आणि सुधारणा व्हाव्यात यासाठी नियमित आढावा महत्त्वाचा असतो, असे ते म्हणाले. “पुनरावलोकन म्हणजे कायदा संपवण्याची मागणी नव्हे; तर तो अधिक परिणामकारक कसा होईल, याचा विचार आहे,” असे त्यांनी नमूद केले.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पासवान यांनी दारूबंदीच्या तत्त्वाला आपला पाठिंबा कायम असल्याचे सांगितले. व्यसनाधीनता कुटुंब आणि समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.chirag paswan मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली दारूबंदी लागू करण्यात आली तेव्हा विरोधी पक्षात असूनही त्यांच्या पक्षाने या निर्णयाचे समर्थन केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली.
यावेळी त्यांनी राज्यात अधूनमधून घडणाऱ्या विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंचाही उल्लेख केला. तसेच दारूची कथित ‘होम डिलिव्हरी’ होत असल्याच्या आरोपांकडे लक्ष वेधत, कायद्याची अंमलबजावणी अधिक कडक आणि पारदर्शक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0