क्लाऊड नाइनच्या ‘सुरमयी शाम’ने जिंकले रसिकांचे मन

02 Mar 2026 13:17:38
नागपूर,
Cloud Nine ‘क्लाऊड नाइन’ संस्थेने रसिकांसाठी हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा असलेला ‘सुरमयी शाम’ हा सुरेल कार्यक्रम सादर केला होता. या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी नगर येथील आठ रस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना मेधा हरिदास, दीपाली पनके, मृदुल पुरोहित आणि शशिकांत वाघमारे यांची होती, तर श्याम बापटे यांनी सहसंयोजक म्हणून काम पाहिले. प्रा. पद्मजा सिन्हा आणि मुकुल पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. उज्ज्वला अंधारे यांनी नेटके व ओघवते निवेदन करून कार्यक्रमाला रंगत आणली.
 
Cloud Nine
 
‘दिसते मजला सुखचित्र नवे’ या मराठी गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘तेरे नाम...’, ‘कोरा कागज था’, ‘वो जब याद आये’, ‘मुझे कितना प्यार है तुमसे’, ‘वो सनम तेरे हो गये हम’, ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’ अशा एकाहून एक सरस अशा तब्बल ३२ सुमधुर गीतांची मैफल रंगली. प्रा. पद्मजा सिन्हा, मुकुल पांडे, रजनी ठाकरे, वैभव पुसदकर, संजय बोरकर, प्रसाद देशपांडे, गौरी बावडेकर, दीपक दुधमोगरे, हेमंत राऊत, प्रीती कुळकर्णी, अस्मिता शिवलकर, मुकुल नांदे, संजय वाघमारे, प्राजक्ता केळकर, सुनील दहिकर, रेखा पाटील, समृद्धी ठाकरे आणि बाबासाहेब ठाकरे या गायक कलाकारांनी सादरीकरण केले. त्यांना महेंद्र ढोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाद्यांची समर्पक साथसंगत दिली. Cloud Nine ‘चाहिए थोड़ा प्यार, थोड़ा प्यार चाहिए’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. बहुसंख्येने उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
सौजन्य: वर्षा किडे कुळकर्णी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0