पुणे
Pune Pimpri citizens Dubai, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर शनिवारी हल्ले केल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातून दुबईला गेलेल्या अनेक नागरिकांना तिथेच अडकावे लागले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील सुमारे ४० नागरिक सध्या दुबईत अडकल्याची माहिती मिळाली आहे.

अडकलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामध्ये माजी नगरसेविका सुमन नेटके आणि अनिता नेटके यांचा समावेश आहे. या नागरिकांना ब्रो खोलपा जवळील एका हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तथापि, ते सर्व घाबरलेल्या अवस्थेत आहेत.जगदीश नावाच्या तरुणाने व्हिडिओद्वारे भारत सरकारकडे मदतीसाठी विनंती केली आहे. त्याने सांगितले, “आमच्या मध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची जबाबदारी आहे की, त्यांनी आमची तातडीने सोडवणूक करावी आणि भारतात सुखरूप आणावे. आमच्या हॉटेलजवळच बॉम्ब हल्ला झाला आहे, त्यामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. सर्वांनी आमची मदत Pune Pimpri citizens Dubai, करावी.”दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांनी राज्य व केंद्र सरकारकडे तसेच राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी आग्रह धरला आहे. त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.