विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान संघाला मिळणार मोठी शिक्षा

02 Mar 2026 12:22:38
इस्लामाबाद, 
punishment-to-pakistan-team पाकिस्तानचा वीस षटकांच्या विश्वचषकातील प्रवास अत्यंत निराशाजनक ठरला. संपूर्ण स्पर्धेत संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि अखेर उपांत्यपूर्व टप्प्यानंतर त्यांचा पत्ता कट झाला. काही अपवाद वगळता बहुतांश खेळाडू सातत्य राखू शकले नाहीत. या अपयशानंतर संघावर कारवाईची टांगती तलवार आली असून मोठ्या दंडाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
punishment-to-pakistan-team
 
संघ बाहेर पडताच चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली. माजी दिग्गज खेळाडूंनीही कामगिरीवर उघडपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळकडून कठोर भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आले. उपांत्य फेरी गाठता न आल्याबद्दल प्रत्येक खेळाडूवर पन्नास लाख पाकिस्तानी रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती अहवालांतून देण्यात आली आहे. गट टप्प्यात भारतकडून झालेला पराभव संघासाठी मोठा धक्का ठरला. punishment-to-pakistan-team त्यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्यांतही अपेक्षित निकाल साधता आला नाही. इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यात अपयश आले, तर श्रीलंकाविरुद्धची झुंज जिंकूनही पुढील फेरीचे तिकीट मिळवता आले नाही. या सलग अपयशांमुळे संघ व्यवस्थापन संतप्त झाले असून कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचे मानले जात आहे.
मंडळातील अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वारंवार अपयश येणे अस्वीकार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. संघाला कडक संदेश देण्यासाठी दंडाची कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. punishment-to-pakistan-team या पार्श्वभूमीवर वरिष्ठ खेळाडूंवर विशेष लक्ष केंद्रीत झाले आहे. माजी कर्णधार बाबर आझम, सध्याचे कर्णधार सलमान अली आघा आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. महत्त्वाच्या सामन्यांत प्रभावी योगदान देता न आल्यामुळे नेतृत्व बदलाची चर्चा देखील रंगू लागली आहे. आगामी काळात संघरचनेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0