हिजबुल्लाहची इस्रायलवर रात्रभर क्षेपणास्त्र वर्षाव!

02 Mar 2026 11:00:05
नवी दिल्ली,
hezbollahs-missile-at-israelमध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र होत असताना लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेने इस्रायलविरुद्ध उघडपणे आघाडी घेतली आहे. अयातुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूनंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिजबुल्लाहने इस्रायलवर रात्रीभर क्षेपणास्त्रे आणि मानवरहित यंत्रांद्वारे हल्ले केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हिजबुल्लाहने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा हल्ला खमेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, लेबनॉनच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी आणि इस्रायलच्या वारंवार होणाऱ्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला.
 
 
 
Hezbollah
 
 
याला उत्तर देताना इस्रायली लष्कराने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हवाई आणि तोफगोळ्यांच्या साहाय्याने कारवाई केल्याचे जाहीर केले. इस्रायलने सांगितले की सीमापार डागण्यात आलेली काही क्षेपणास्त्रे त्यांनी हवेतच पाडली, तर काही मोकळ्या जागेत कोसळली. या हल्ल्यांमध्ये मोठ्या नुकसानीची किंवा जखमींची माहिती समोर आलेली नाही. सीमाभागात दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या या कारवायांमुळे तणाव अधिक वाढला असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे.
Powered By Sangraha 9.0