होळीच्या उत्सवात 'अश्लील वर्तन नको'

02 Mar 2026 16:54:10
नवी दिल्ली,
women protection Holi   संपूर्ण देशात सध्या होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रंगांच्या जल्लोषात लोक एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करीत असताना, काही प्रसंगी महिलांवरील अनैच्छिक स्पर्श, जबरदस्तीने रंग लावणे किंवा अश्लील वर्तन यासारखी घटनाही घडत आहेत. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील दीपक ठुकराल यांनी स्पष्ट केले आहे की, होळीच्या नावाखाली होणाऱ्या गैरवर्तनावर आता भारतीय कायद्याअंतर्गत कठोर कारवाई होऊ शकते.
 

women protection Holi  
महिलांवरील विनयभंग गंभीर गुन्हा मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीने महिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना स्पर्श केला, जबरदस्तीने रंग लावला, मिठी मारली किंवा विनयभंगाचा प्रयत्न केला, तर दोषींना १ ते ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. या प्रकरणात विशेषतः बीएनएस कलम ७४ अंतर्गत गुन्हे दाखल केले जातात, जे आधीच्या आयपीसी कलम ३५४ पेक्षा अधिक कठोर कारवाईची तरतूद करतात.
लैंगिक छळ आणि अश्लील women protection Holi  वर्तनावर देखील आता अधिक स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे. महिलांच्या संमतीशिवाय त्यांना स्पर्श करणे, अश्लील हावभाव करणे किंवा अशा वर्तनाने अस्वस्थ करणे गुन्हा मानले गेले आहे. बीएनएस कलम ७५ अंतर्गत दोषींना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही भोगावे लागू शकतात.
शारीरिक छेडछाड शिवाय, अश्लील शब्द किंवा इशाऱ्यांद्वारे महिलांची प्रतिष्ठा दुखावणे हेही गुन्हा आहे. होळीच्या नावाखाली अश्लील टिप्पण्या करणे, टोमणे मारणे किंवा अपमानजनक शब्द वापरणे याप्रकारच्या घटकांवर बीएनएस कलम ७९ अंतर्गत कारवाई करता येते. या कलमानुसार दोषींना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.कायद्याच्या या स्पष्ट तरतुदीमुळे आता होळी साजरी करताना प्रत्येक व्यक्तीला महिलांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे अनिवार्य झाले आहे. लोकांनी उत्सवाच्या आनंदात women protection Holi  दुसऱ्याच्या अधिकारांचे उल्लंघन होऊ नये, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कायदा कोणालाही तुमच्या इच्छेविरुद्ध रंग लावण्याचा अधिकार देत नाही, असा संदेश या घटनांमधून समाजाला दिला जात आहे.ही खबरदारी केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक जबाबदारीचीही आठवण करून देते, ज्यामुळे होळीचा उत्सव सुरक्षित आणि सर्वांसाठी आनंददायी राहू शकेल.
Powered By Sangraha 9.0