पर्यटनासाठी गेलेले नागपूरकर अडकले

02 Mar 2026 22:06:29
स्थिती सामान्य होईपर्यंत दोहा, शारजाह सेवा बंद राहणार
खाड़ी देशांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक
नागपूर,
Iran-Israel War इराणच्या आसपासच्या अनेक खाड़ी देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्याचा परिणाम सौदी अरेबिया येथे जाणार्‍या उड्डाणांवरही झाला आहे. आखाती देशातून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार्‍या विमानांचे आवागमन बंद झाले असून बहुतांश विमान विमान सेवा बंद केली. नागपुरातून कतार एअरवेजने दोहा-नागपूर-दोहा तर, एअर अरेबियाने शारजाह - नागपूर -शारजाहच्या सेवा बंद केल्या आहेत. स्थिती सामान्य होईपर्यंत या विमान सेवा बंद राहणार आहेत. दुबईमध्ये पर्यटनासाठी गेलेले नागपूरकर तसेच अन्य आखाती देशांमध्येही शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले लोक अडकले आहेत. प्रशासनाकडून त्यांचीही माहिती घेतली जात आहे. देशांतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्यामुळे मुंबई आणि दिल्ली विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात असून त्याचा फटका आता इतर उड्डाणांना बसला आहे.
 

AIRPORT 
 
नातेवाईकांमध्ये चिंता
मुख्यत: हवाई हल्ले होताच अनेक विमान रद्द झाल्याने तीनशेहून अधिक प्रवासी दोहा व शारजाह येथे अडकले आहेत. दोन देशांच्या हल्ल्यानंतर दुबईसह आखाती देशातही हल्ले झाले या देशांमध्ये असलेल्या भारतीयांच्या नातेवाईकांमध्ये चिंता पसरली आहे. यात हजारोंच्या संख्येने नागपूरकर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत सूचना घेण्यास सुरुवात केली आहे.
शारजाह व दुबईत मोठया संख्येने नागपूरकर
जिल्हा प्रशासनातर्फे काही दुरध्वनी नंबर जारी केले असून दुबईमध्ये किती नागपूरकर आहेत, याची माहिती घेणे सुरू आहे. सरकार व दुतावासातर्फे अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. नागपूरच्या नातेवाईकांनी तातडीने योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 
 
Iran-Israel War दुबई, शारजाह, कुवैत, ओमान, अबुधाबीत अनेक मराठी, सिंधी समाजाचे तरुण व्यवसायानिमित्त दुबईसह इतर देशात ये-जा करीत असतात. सीताबर्डीतील हिंद वस्त्र भंडारचे मालक मुलानी यांचे कुटुंब तर दुबईत स्थायिक आहे. ओमानच्या रिलायंस कंपनीतही अनेकजण कार्यरत आहे. शारजाह व दुबईत मोठया संख्येने नागपूरकर उद्योग व्यवसायाच्या निमित्याने रहिवासी झाले आहेत. दुबई येथील रुग्णालयासह विविध कंपण्यांमध्ये अनेक नागपूरकर नोकरी व व्यवसायानिमित्त आहेत. तर काही देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थी असून हे विद्यार्थी सुरक्षित असल्याची माहिती आहे. मात्र, दुबई येथे पर्यटनासाठी गेलेले नागरिक आहेत. दुबईमध्ये अनेक नागरिक पर्यटनासाठी गेलेले नागरिक अडकले आहेत.
 
 
नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले
विदेश मंत्रालयाने एक नमुना तयार करून दिला असून यात संबंधित नागरिकांचे वय, पत्ता, संपर्क माहिती आणि त्यांचे तपशील घेतले जात आहेत. अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी शासनाने काही नंबरही दिले आहेत. युद्धामुळे इराण आणि इस्राईलमध्ये अडकलेल्या नागपुरातील मदतीसाठी योग्य व्यवस्थापन केले जात असल्याची माहिती -जिल्हा प्रशासन सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0