इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर पेटला!

02 Mar 2026 11:26:31
नवी दिल्ली,
Kashmir is burning because of Iran इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन पेटले असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावरही दिसून येत आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने सोमवारीपासून पुढील दोन दिवस सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जम्मू येथे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही उपाययोजना पूर्णतः खबरदारी म्हणून करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री सकिना इटू यांनी स्पष्ट केले की, परिस्थिती संवेदनशील असल्याने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
 

kashmir and khamenei 
 
प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींचा आढावा घेतल्यानंतरच संस्था पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, हिवाळी सुट्टीनंतर इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा सोमवारी पुन्हा सुरू होणार होत्या. त्याआधी २३ फेब्रुवारी रोजी सुमारे सत्तर दिवसांच्या सुट्टीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा काश्मीर विभागात तसेच जम्मू विभागातील हिवाळी पट्ट्यात सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, सध्याच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0