श्री महालक्ष्मी मंदिर मधुबन लेआउटमध्ये कीर्तन महोत्सव

02 Mar 2026 13:23:11
नागपूर,
Madhuban Layout श्री महालक्ष्मी मंदिर, मधुबन लेआउट, मनीष नगर येथे दिनांक ४ मार्च (बुधवार) ते ८ मार्च (रविवार) २०२६ दरम्यान सायंकाळी ६ ते ७.३० या कालावधीत कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाची सुरुवात दिनांक ४ मार्च रोजी ह. भ. प. प्रसाद जोशी यांच्या कीर्तनाने होईल.
 
 
Madhuban Layout
 
त्यानंतर ५ मार्च रोजी ह. भ. प. प्रज्ञा कुळकर्णी, ६ मार्च रोजी ह. भ. प. सुरेश खापेकर, ७ मार्च रोजी ह. भ. प. नेहा इंदुरकर आणि ८ मार्च रोजी ह. भ. प. शाम बुवा धुमकेकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. Madhuban Layout मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरदचंद्र लांबे यांनी सर्व किर्तन प्रेमींना आवाहन केले आहे की ते कार्यक्रमाला उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा.
सौजन्य: आसावरी कोठीवान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0