माजी इराणी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद ठार?

02 Mar 2026 10:54:26
तेहरान,
Mahmoud Ahmadinejad killed इराणवर सुरू असलेल्या इस्रायली हवाई कारवायांदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे. अहमदीनेजाद यांनी आपल्या कार्यकाळात इस्रायलविरोधात तीव्र वक्तव्ये केली होती आणि त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते.इस्रायली वृत्तमाध्यम ‘मा’आरिव्ह’ने दिलेल्या माहितीनुसार, अहमदीनेजाद यांच्या निवासस्थानी लक्ष्यित हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र, या दाव्याला इराणी अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
 
 

Mahmoud Ahmadinejad killed 
अहमदीनेजाद यांनी २००५ ते २०१३ या कालावधीत इराणचे सहावे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले. त्याआधी ते तेहरानचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात इराणच्या अणुकार्यक्रमामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अनेक निर्बंध लादले होते. दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईनंतर संपूर्ण पश्चिम आशियात तणाव अत्यंत वाढला आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह काही वरिष्ठ लष्करी अधिकारीही या कारवाईत मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. इस्रायलने अनेक वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा दावा केला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोठ्या संख्येने नेते ठार झाल्याचे विधान केले आहे. या सर्व घडामोडींमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0